Saturday, November 21, 2026
HomeUncategorizedमोहरमपूर्वी अकोट ग्रामीण पोलिसांची सज्जता; परिसरात रूट मार्च

मोहरमपूर्वी अकोट ग्रामीण पोलिसांची सज्जता; परिसरात रूट मार्च

(मतीन शेख)

 

अकोला : आगामी मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांनी शहरातील विविध भागांत दि.२५ जुन रोजी रूट मार्च काढून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने काढण्यात आलेल्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील भाग आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात पोलिसांनी विशेष पाहणी केली. मोहरम सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संशयास्पद हालचाली अथवा व्यक्तींबाबत त्वरित पोलिसांना माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले. मोहरम उत्सव परंपरेप्रमाणे शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि उत्साहात पार पडण्यासाठी सर्व समाजघटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अकोट ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!