Saturday, June 13, 2026
HomeUncategorizedआधी चार, आता आणखी दोन पोलिस अधिकारी निलंबित; शिवानी कळमेकर प्रकरणात पोलिसांवर...

आधी चार, आता आणखी दोन पोलिस अधिकारी निलंबित; शिवानी कळमेकर प्रकरणात पोलिसांवर कारवाईचा बडगा कायम! ‘काहींना समाधान तर काहींना खंत’….

(मतीन शेख)

बुलढाणा : शिवानी कळमेकर प्रकरणात कारवाईचे सत्र सुरूच असून या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या आता सहावर पोहोचली आहे. यापूर्वी बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी एका पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. त्यानंतर अमरावती पोलिस आयुक्तांनीही कठोर भूमिका घेत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना निलंबित केले आहे. शिवानी कळमेकर प्रकरणातील कामकाजातील त्रुटी तसेच कथित हलगर्जीपणाची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सलग होत असलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून या प्रकरणातील चौकशी आणखी व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या कारवाईमुळे संबंधित यंत्रणांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला निष्पक्ष चौकशी व जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने या निर्णयाचे स्वागत होत असताना, दुसऱ्या बाजूला निलंबित अधिकाऱ्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रकरणात सध्या ‘काहींना समाधान तर काहींना खंत’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याची सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!