Saturday, November 21, 2026
HomeFeatured न्यूज़एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का, लखन भैय्या प्रकरणात जन्मठेपेची...

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का, लखन भैय्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

प्रतिनिधी, मतीन शेख

लखन भैय्या (३३, रा. वसई, मुंबई) याच्यावर गँगस्टर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याला मुंबई पोलिसांच्या पथकाने ११ नोव्हेंबर २००६ रोजी छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून ताब्यात घेतले आणि त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईत अटक केली व वर्सोवा या ठिकाणी लखन भैय्याचे एन्काउंटर करण्यात आले. महाराष्ट्रातील २००६ च्या लखन भैया बनावट चकमक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने १३ जणांना दोषी घोषित केले होते. या प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला असून त्यांना तीन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते.

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का, लखन भैय्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

गँगस्टर छोटा राजनचा कथित जवळचा सहकारी रामनारायण गुप्ता याच्या २००६ च्या मुंबई बनावट चकमक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी माजी पोलीस कर्मचारी प्रदीप शर्माला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाचा २०१३ चा शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय चुकीचा आणि असमर्थनीय ठरवून रद्द केला. ट्रायल कोर्टाने शर्मा यांच्या विरोधात उपलब्ध असलेल्या जबरदस्त पुराव्यांकडे दुर्लक्ष केले होते. पुराव्याच्या साखळीवरून त्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्टपणे सिद्ध झाले असे न्यायालयाने म्हटले आहे. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला असून शर्मा यांना तीन आठवड्यांत संबंधित सत्र न्यायालयात शरण येण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का, लखन भैय्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

उच्च न्यायालयाने पोलिसांसह १३ जणांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आणि अन्य सहा आरोपींची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्यांची निर्दोष मुक्तता केली. या हत्येप्रकरणी १३ पोलिसांसह २२ जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली आणि २१ आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २१ आरोपींपैकी दोघांचा कोठडीत मृत्यू झाला. शर्मा यांच्याविरोधात फिर्यादी पक्षाने याचिका दाखल केली होती. आरोपींनी त्यांच्या शिक्षेला आव्हान देत उच्च न्यायालयात अपील दाखल केले तर फिर्यादी आणि मृताचा भाऊ रामप्रसाद गुप्ता यांनी प्रदीप शर्माला दोषमुक्त करण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!