Saturday, November 21, 2026
HomeUncategorizedसायबर फसवणुकीप्रकरणी म्युल बँक खात्याच्या धारकाविरुद्ध गुन्हा दाखल! संग्रामपूर तालुक्यातील दुसरी घटना 

सायबर फसवणुकीप्रकरणी म्युल बँक खात्याच्या धारकाविरुद्ध गुन्हा दाखल! संग्रामपूर तालुक्यातील दुसरी घटना 

(मतीन शेख)

 

संग्रामपूर : सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आल्याचा संशय असलेल्या म्युल (Mule) बँक खात्याच्या धारकाविरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात कार्यरत गोपनीय अंमलदार पोलीस शिपाई मनिष त्र्यंबक वानखेडे यांच्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक २२८/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे बँक ऑफ महाराष्ट्र, संग्रामपूर शाखेतील खाते क्रमांक ६०५५३९२२७४५ (IFSC : MAHB००००५५७) सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२५ रोजी १२.०१ ते रात्री ११:५९ या कालावधीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. एनसीसीआरपी पोर्टलवरील तक्रार अकाउंट नंबर ३१९०१२६००००२९२ नुसार तक्रारदाराच्या खात्यातील ५० हजार रुपये संबंधित खात्यात जमा झाल्यानंतर धनादेशाद्वारे (चेकद्वारे) काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे तक्रारदाराची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!