(मतीन शेख)
अकोला : बाळापुर तालुक्यात येत असलेल्या ग्राम हातरुन आरोग्य केंद्र येथील डॉक्टर व कर्मचारी वर्ग मुख्यालय न रहता ती आप आपल्या शहरातून ये-जा करतात. त्यामुळे दिवसा लवकर अधिकारी व कर्मचारी येत नसून ते आप आपल्या मर्जीने ये-जा करतात. अशातच मंगळवारी संविधान दिवस असतांना व शासनाचे आदेश असतांना आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. ५ वाजे पर्यंत आरोग्य केंद्र मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला नसल्यामुळे स्थानिक पत्रकारांनी सोशल मीडियावर आरोग्य केंद्राला संविधान दिवसाचा विसर अशी पोस्ट टाकताच घाई गडबडीत संबंधित कर्मचारी धावून येऊन संध्याकाळी ६ वाजता संविधान दिवस साजरा करण्यात आला. त्यात एक कर्मचारी दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या दारुड्या कर्मचारीला प्रतिनिधींनी कॅमेरा मध्ये कैद केले आहेत. संपूर्ण दिवस सोडून संध्याकाळी संविधान दिवस साजरा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी विरुद्ध कारवीची मागणी परिसरात जोर धरत आहे. त्या दारुड्या कर्मचाऱ्यांना अभय कोणाचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

