Saturday, November 21, 2026
Homeनेशनल न्यूज़सीताबाई संगई शाळेतअल्पसंख्यांक कोठा नाही! शिक्षण विभागाच्या अहवालाने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ;...

सीताबाई संगई शाळेतअल्पसंख्यांक कोठा नाही! शिक्षण विभागाच्या अहवालाने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; कडक कारवाईचे आदेश!

जिल्हा प्रतिनिधी ( कुशल चौधरी )

अंजनगाव सुर्जी येथील नामांकित व गैरकारभारत पटाईत असलेली शाळा सीताबाई संगई शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत कोणताही राखीव कोठा शाळा नसल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालात म्हटल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सीताबाई शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याच्या वेळेस अनेक पालकांना या संस्थेतील संचालकांचे घरी चकरा माराव्या लागतात संस्थाचालकांच्या राखीव प्रवेश कोठ्याच्या आड अनेक पालकांकडून आज पर्यंत मोठ्या प्रमाणात डोनेशन घेण्यात आल्याची संपूर्ण शहरात पालकांमध्ये जोरदार चर्चा आहे. शाळेचे संस्थापक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत खूप मोठा घोळ करतात संस्था सर्व लोकांना सांगते की आम्हाला अल्पसंख्यांक कोटा आहे त्यामुळे ५०% टक्के विद्यार्थी आम्ही अल्पसंख्यांक कोट्यातून भरतो व राहिलेले लकीड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांची भरती करतो व अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याकरता संस्थाचालक यांच्यासाठीकोणताही राखीव कोठा नसल्याचे शासन निर्णयात नमूद आहे तसेच संस्थाचालक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणताही राखीव कोटा नाही व राखीव कोठा मंजूर नसल्याने व राखीव कोट्यातून कोणत्याही प्रकारचा विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया करू नये असे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सीताबाई संगई शाळेला स्पष्टपणे का पत्राद्वारे सांगितले आहे. तरीसुद्धा संस्थाचालकांच्या राखीव कोठ्याखाली काही विद्यार्थ्यांना डोनेशन घेऊन प्रवेश दिल्याची पालकांमध्ये चर्चा आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून सतत सीताबाई संगई शाळेचा व सिताबाई संगई संस्थेचा खुप मोठा गैरप्रकार उघडकिस आणण्यासाठी कुशल चौधरी यांनी सतत प्रयत्न केले आहे. गैरप्रकार उघडकीस आणण्यात चौधरी यांना यश सुद्धा मिळाले असून कुशल चौधरी यांनी वरिष्ठ स्तरावर केलेल्या तक्रारी वर शिक्षणाधिकारी प्राथमिक अमरावती यांनी सीताबाई संगई शाळेला दि ६ /११/ २०२४ जा. क्र. /जिप/शिअ /खाप्राशा/ ९१९०/२४ आदेशपत्र दिले व त्यात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. शाळा मुख्याध्यापक व संस्था यांनी प्रचलित शासन नियमांचे उल्लंघन केल्याची आढळून आल्यास शाळेची मान्यता रद्द करणे बाबतची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे स्पष्ट शिक्षण विभागाच्या पत्रात म्हटले आहे. तसे पत्र सदर संस्थेला शिक्षण विभागाने बजावले आहे. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याकरता संस्था चालक यांच्यासाठी कोणताही राखीव कोटा असल्याचे शासन निर्णय दिनांक २७ /५/ २०२३ मधे व RTE Act २००९ /मध्ये नमूद नाही त्यामुळे संस्था अंतर्गत कोटातून केलेली विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ही नियमबाह्य असून पारदर्शक प्रवेश प्रक्रियेचे पालन मुख्याध्यापकांनी व संगई संस्थेने केलेले नाही असे शिक्षण विभागाच्या चौकशी अहवालात नमूद केले आहे. शासन निर्णय दिनांक २४/८ /२०१० मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार १००% टक्के अनुदानित शाळेतील पालक शिक्षक संघाने पालकाकडून सहयोग राशी जमा करण्याचा घेतलेला ठराव अधिकृत ठरत नाही तसेच शाळेने व संस्थेने विद्यार्थी प्रवेशा करीता पालकाकडून जमा केलेली सहयोग राशी ही बाब कॅपिटेशन फि ॲक्टचे उल्लंघन करणारे असून RTE Act २००९ अंतर्गत नमुना दोन अन्वये शाळेस दिलेल्या मान्यतेमधील अट क्रमांक ५ चा भंग झालेला आहे. तसेच संस्थेस शाळेतील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणताही कोठा राखीव कोटा मंजूर नसल्याने संस्थेने राखीव कोट्यातून प्रवेश प्रक्रिया करू नये ही बाब विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया कालावधीत कार्यालयाच्या दर्शनी भागात नोटीस बोर्डवर लावावी सीताबाई संघई शाळेला व संगई संस्थेला राखीव कोटा नाही असे अधिकृत नियम व ठरावाची संपूर्ण माहिती शिक्षणाधिकारी अमरावती यांनी कुशल चौधरी यांना पत्राद्वारे कळविले आहे तसेच संघई संस्थेला कडक निर्देश दिले की जर आपण दोषी आढळल्यास आपल्या संस्थेवर कारवाई करण्यात येईल व शाळेची मान्यता सुद्धा रद्द करण्यात येईल तसेच सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या संगई शाळेच्या मुख्याध्यापकाची वेतन वाढ बाबत कारवाई शासन नियमानुसार थांबविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या पत्रात म्हटले आहे. सीताबाई संगई शिक्षण संस्थेच्या गैरप्रकाराबाबत शासन काय कार्यवाही करते याकडे सर्व तालुक्याचे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!