वर्धा: समृद्धी महामार्ग हा अपघातासाठी ओळखला जात आहे. या महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच आहेत. आज दि. २९ एप्रिल शनिवारी रोजी हरियाणा येथील पंचकुला पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरिक्षक नेहा चव्हाण आणि त्याचे कर्मचारी एका फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याला घेऊन पोलीस वाहन बोलेरोने नागपुरच्या दिशेने जात होते. समृद्धी महामार्गावर वर्ध्यापासून ५ किमी. अंतरावर असलेल्या पांढरकवढा गावाजवळ त्यांचे बोलेरो वाहन ट्रकला पाठीमागून धडकले. धडक जबर असल्याने वाहनाचा चुरडा झाला. त्या वाहनामध्ये महिला पोलीस निरिक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यु झाला. तर सहाय्यक उपनिरिक्षक सुखविंदर सिंह,मिठ्ठू जगडा, वाहन चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनाजी जळक, पोलीस अधिकारी संदिप खरात आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. व जखमींना सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.
समृद्धी महामार्गावर अपघात, हरियाणा येथील महिला पोलीस निरिक्षक ठार
RELATED ARTICLES

