(मतीन शेख)
संग्रामपूर : येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा व आठवडी बाजारातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक केंद्रीय मुलांची शाळा यांचे एकत्रिकरण करण्यात आले असून, या एकत्रित नवीन शाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे.
दिनांक ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेमध्ये नवनिर्मित शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शारदा गजानन राजनकार तर उपाध्यक्षपदी प्रवीण टाकसाळे यांची सर्वानुमते व अविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, उपाध्यक्षपदी निवड झालेले प्रवीण टाकसाळे हे संग्रामपूर येथील कृषी विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी दयालसिंग चव्हाण, कविता अमोल सोनोने, श्रीकांत भोंबळे, राहुल वानखडे, शिवशंकर सुरत्ने, पूजा तायडे, शारदा कराळे, रीना वानखडे, पदमा राऊत, शेख अमीर शेख शेखजी व स्वाती आपतूरकर यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खंडारे ताई यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षक गिरीश इंगळे, रामदास गोगटे, शांताराम अडकणे, वर्षा घायल, मंगला सोळंके यांच्यासह अन्य शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.