Saturday, November 21, 2026
HomeUncategorizedशाळेच्या पटांगणात साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न; पालकांचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

शाळेच्या पटांगणात साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न; पालकांचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

(मतीन शेख)

 

बुलढाणा: जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा संग्रामपूर येथील शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पालकांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सकाळी काही पालक शाळेत पोहोचले असता शाळा बंद असल्याचे दिसून आले. शाळेच्या पटांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्या पाण्यात विषारी सापांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे धोकादायक ठरत असल्याचेही पालकांनी म्हटले आहे. शाळेच्या परिसरातील साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा करून परिसर सुरक्षित करण्यात यावा, आवश्यक स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करून शाळा नियमित सुरू करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. या निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साबीर खान यांच्यासह शेख शकील शेख उमर, शेख इरफान शेख उस्मान, अनिस खान करीम खान, शेख रियाज शेख हारुन कुरेशी, हबीब खान हुसेन खान तसेच अन्य पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!