(मतीन शेख)
बुलढाणा: व्हॉईस ऑफ मिडीया संग्रामपूर तालुकाध्यक्ष नारायण सावतकार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या तालुकाध्यक्षपदी मिर मकसुद अली मिर मुजफ्फर अली यांची आज दि.५ जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. वरवट बकाल येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित व्हॉईस ऑफ मिडीया पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर करून ही शिफारस वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली होती. त्यानुसार व्हॉईस ऑफ मिडीया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या प्रसंगी व्हॉईस ऑफ मिडीया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य कोअर कमिटी सदस्य अरुण जैन, सिद्धार्थ आराख, ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, रमेश लहाने, माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ, लक्ष्मण बगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हॉईस ऑफ मिडीया बुलढाणा जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते यांनी मिर मकसुद अली यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मिर मकसुद अली यांचा गुलपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्हॉईस ऑफ मिडीया जिल्ह्यातील पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

