(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील रहिवासी व किराणा व्यापारी शेख मोहम्मद शेख जानमोहम्मद (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने दिनांक २४ रोजी शेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
स्व. शेख मोहम्मद हे स्वर्गीय पत्रकार अनिस शेख यांचे वडिल होत. त्यांच्या पार्थिवावर वरवट बकाल येथील स्थानिक कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. अंत्ययात्रेत बहुसंख्य समाजबंधूंनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, मुलगी, नातवंडे असा आप्त परिवार आहे.