Saturday, November 21, 2026
Homeनेशनल न्यूज़मोठी बातमी! आयपीएस रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी पुनर्नियुक्ती

मोठी बातमी! आयपीएस रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी पुनर्नियुक्ती

(मतीन शेख)

मुंबई : आयपीएस रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक (DGP) म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी सत्ताधारी महायुतीने दणदणीत विजय मिळवला आणि आता राज्यात पुढचे सरकार स्थापन होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय नोंदवल्यानंतर दोन दिवसांनी आयपीएस अधिकारी शुक्ला यांची महाराष्ट्र डीजीपी म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी, राज्यातील आदर्श आचारसंहितेदरम्यान, निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे डीजीपी रश्मी शुक्ला यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. पराभवानंतर, सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली. राज्याचे माजी डीजीपी रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला असून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असतांना आणि मतमोजणी सुरू असताना ही भेट झाली. रश्मी शुक्ला यांनी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली असून त्याच दिवशी मतमोजणी सुरू होती. अतुल लोंढे यांनी ही बैठक आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हटले असून रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रश्मी शुक्ला गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!