Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedपोलिसांचा तस्करीच्या रॅकेटवर प्रहार! गुटख्याची मोठी खेप पकडली; वाहनासह ७० लाखांचा मुद्देमाल...

पोलिसांचा तस्करीच्या रॅकेटवर प्रहार! गुटख्याची मोठी खेप पकडली; वाहनासह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

(मतीन शेख)

 

बुलढाणा: गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राबविलेल्या नियोजनबद्ध कारवाईत प्रतिबंधित गुटखा तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. बुऱ्हाणपूरहून यवतमाळच्या दिशेने निघालेल्या आयशर वाहनातून लाखो रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला आहे. १३ जून रोजी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांना प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली आणि वरवट बकाल–शेगाव मार्गावरील एका बेकरीजवळ नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान एमएच ४० जीटी २९६५ क्रमांकाचे आयशर वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. वाहन थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. मात्र त्याच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी वाहनाची कसून तपासणी केली. या तपासणीत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा उघडकीस आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये बाजीराव गोल्ड, मस्तानी टोबॅको, नजर १०००, एन-०५ प्रीमियम च्युइंग टोबॅको आणि प्रीमियम नजर ९०० या ब्रँडच्या उत्पादनांचा समावेश आहे. तंबाखूजन्य पदार्थांची किंमत ५० लाख १३ हजार ९२० रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले २० लाख रुपये किमतीचे आयशर वाहनही जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला. या प्रकरणी सरूर अहमद नूर अहमद रा. अकोला याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

सतर्क पोलिसांची तत्पर कारवाई

 

पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील राऊत, सुधाकर थोरात, योगेश कुंवारे आणि मंगेश सोळंके यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!