(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यातील फरार आणि पाहिजे आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या विशेष शोधमोहीमेत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सुनिल अंबुलकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करून जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत आज दि.१९ नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन रायपूर अ.क्र. १६/२०२६, कलम ३०२,२०१, १२०(ब) भा.दं.वि. मधील खुनाच्या गुन्ह्यात सन २०१६ पासून फरार असलेला आरोपी शेख इरफान उर्फ काल्या शेख अश्पाक वय ३३ रा. मिलींदनगर बुलढाणा याला बुलढाणा शहरातून ताब्यात घेतले. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन रायपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच दि.१८ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन देऊळगावराजा अ.क्र. २६९/२०२४, कलम ३०९ (६), ३१० बिएनएस मधील प्रकरणात फरार असलेला अभय दिलीप डोंगर वय २४ रा. कन्हैय्या नगर जालना यालाही जालना येथून अटक करून देऊळगावराजा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार पार पडली. पथकात पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, पोना अनंता फरतळे, सुनिल मिसाळ, पोकॉ गणेश वाघ, मनोज खरडे, मपोकॉ आशा मोरे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचा समावेश होता.

