दर्यापूर(ता.प्रतिनिधी)-आजच्या युगात सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारी असून,उच्चशिक्षित युवक हाताला काम नाही म्हणत शासनाला दोष देत बेरोजगार म्हणून ठिकठिकाणी आपल्या जीवनातील अमूल्य वेळ गमावत असल्याचे पहावयास मिळतात,पण याच युवकांना एक दिशादर्शक ठरत आहे ते दर्यापूर शहरातील कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरात हॉटेल व पानठेला चालविणारे इसामुद्दीन यांचा जीवनप्रवास.
गेल्या पंधरा ते वीस वर्ष हॉटेल व्यवसाय व पानठेला या व्यवसायशी नाळ जोडलेला इसामुद्दीन हे आपल्या कुटुंबासह व्यवसायात रमले असतांना मागील वर्षात मात्र अचानक कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरला पेट्रोल पंप मिळाला आणि त्याचा व्यवसाय बंद पडला होता.
पण तरीही शेवटपर्यंत जिद्द न सोडता पून्हा त्याच जागेवर व्यवसाय कसा करता येईल हे पाहणारा इसामुद्दीन हे सर्व राजकीय नेते सोबत संबंध ठेवून आपला व्यवसाय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते,मात्र पदरी अपयश आले व जागा खाली करून द्यावी लागली.
त्यामुळे दोन्ही भावांचा व्यवस्थित सुरू असणारा संसार व्यवस्तीत असताना दोन्ही भावांचे कुटुंब उघड्यावर आलं.
परंतु म्हणतात ना जिद्द चिकाटी व नशिबाची साथ जर मिळाली तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकतो त्याचे उदाहरण म्हणजे इसामुद्दिन होय.
पुन्हा जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट उभारताना मार्केट दुकानचा हऱ्यास जेव्हा झाला, तेव्हा पुन्हा हिसामुद्दिनने आपल्या भावासोबत घेऊन व्यवसाय करायचे ठरवले,दुकानाची बोली बोलून पहिले भावाला व्यवसायाला साथ देऊन त्याला त्याच्या पायावर उभे केले व नंतर व्यवसायाची जिद्द होतीच, नंतरच्या झालेल्या शेवटच्या दुकानांच्या हराशीमध्ये बोली बोलत एक नाही दोन-तीन दुकाने भाड्याने घेतली व आज एक छोटा उद्योजक बनला आहे. इसामुद्दिनने आलुबोंडा वळा हॉटेल पासून तर उन्हाळ्यामध्ये लागणाऱ्या सर्वच गोष्टी एका छताखाली आणल्या आहेत.त्यामध्ये त्याला लाखो रुपयांच्या छोट्या छोट्या मशीन आणाव्या लागल्या,प्रामुख्याने उसाचा रस हा रसाला हात न लावता एकदम ग्लासामध्ये व ते थंड ,अशी मशीन आणली आहे. त्याचबरोबर गोला हात न लावता मशीनी द्वारे तयार होतो,ती मशीन सुद्धा आणली. त्यावरही मात करत कोण आईस्क्रीम वेगवेगळ्या फ्लेवर तयार होऊ लागले आज एका छताखाली काही लागलं खाण्यापिण्याचं (अल्काहोल सोडून) सर्व काही मिळत आहे व तेही अद्यावत मुंबई नाशिक पुणे या शहराला लाजवणारं दुकान दर्यापुरात उभ केले आहे येता जाता सर्वांची नजर या दुकानाला लागेल याची भीती वाटत आहे आज एका ज्येष्ठ पत्रकार कुटुंबाने सहज अमरावती वरून शेगावला जाता जाता राजेश राजोरे यांनी भेट दिली तुला काही पाहून होते ही छोट्या तालुका स्तरावर उभं केलेलं काम पाहून त्यांनी अनयास हिसामुद्दीन यांचे तोंड भरून कौतुक केले व त्याच्या सेवा कार्याला शुभेच्छा दिल्या.
दर्यापूर येथील इसामुद्दीनने निर्माण केला युवकांसमोर आदर्श…… लहानसा पानठेला व्यवसाय झाला आता अत्याधुनिक उद्योग
RELATED ARTICLES