दिनांक २६/०२/२०२३ रोजी ०७/०० वा सुमारास बाभळी परिसरात गोवंशाची अवैधरित्या कटाई होत आहे अशा पोलीस स्टेशन येथे मिळालेल्या गोपणीय खात्रीशीर माहोतोवरून अवैधरित्या गोवंश कटाई होत असलेल्या ठिकाणी कुरेशीपुरा, बाभळी दर्यापूर भागात रेड केला असता दोन इसम मासांचे टुकडे करित असतांना मिळुन आले. आजुबाजुला गोवंश मांसाचे टुकड़े असे १५० किलो गोवंश मांस व कटाईच्या सुऱ्या, कुऱ्हाडी तसेच वजनकाटा ( विक्रीचे साहीत्य) असा एकूण ३२,२०० रूपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद इसमांना ताब्यात घेवून नाव विचारले असता १) शेख समोर शेख करिम वय २२ वर्ष २) शेख साहील शेख शेख शहीद वय १९ वर्ष दोन्ही रा. कुरेशीपुरा बाभळी, दर्यापूर असे सांगितल्याने नमुद इसमांचे कृत्य गुन्हा कलम ५ (क), १(अ). ६ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये होत असल्याने पोलीस स्टेशन दर्यापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.अविनाश बारगळ पोलीस अधिक्षक अम.ग्रा. तसेच मा.सचिद शिंदे उपविभागिय पोलीस अधिकारी सा. दर्यापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संतोष आर ताले ठाणेदार दर्यापूर, सोबत पोहेको प्रभाकर डोंगरे, पो (स्टॉफ नापोका प्रविण मोकळे, नितीन पाटोल, सिद्धार्थ आठवले, रवि धानोरकर, सुनिल साबळे पोकों पवन पवार प्रदीप गणेशे, पंकज ठाकरे मपोका किरण सरदार व सैनिक विनोद वाघ पांजर, अनिल वानखडे, धीरज यादव, अविनाश गवई, दीपक फूडवाईक यांनी केली.