Saturday, November 21, 2026
HomeUncategorizedटुणकीत सोनाळा पोलिसांची विशेष नाकाबंदी; वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा जनजागृती

टुणकीत सोनाळा पोलिसांची विशेष नाकाबंदी; वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा जनजागृती

(मतीन शेख)

 

संग्रामपूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच वाहतूक नियमांचे पालन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोनाळा पोलीस स्टेशनतर्फे टुणकी येथे विशेष उपक्रम राबविण्यात आला. ठाणेदार संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि.१३ जुलै रोजी सकाळी ७ ते ८.४५ या वेळेत टुणकी बसस्थानक परिसरात नाकाबंदी करण्यात आली. या कारवाईदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एका वाहनचालकावर ड्रंक अँड ड्राइव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली, तर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आणखी १० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आदिवासी विद्यालय, टुणकी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांना सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत, प्रवासादरम्यान कोणी त्रास देत असल्यास, पाठलाग करत असल्यास किंवा छेडछाड करीत असल्यास तात्काळ सोनाळा पोलीस स्टेशन, ‘पोलीस काका’ अथवा ‘पोलीस दीदी’ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमातून वाहतूक नियमांचे पालन, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश सोनाळा पोलिसांनी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!