Sunday, November 22, 2026
Homeक्राइम न्यूज़अखेर ६ वर्षीय राधिकावर अत्याचार करणारा आरोपीचा पोलीसांनी लावला शोध, मंदिरासमोर पुजेचे...

अखेर ६ वर्षीय राधिकावर अत्याचार करणारा आरोपीचा पोलीसांनी लावला शोध, मंदिरासमोर पुजेचे सामान विकणारा भामटा निघाला आरोपी

 

(महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मतिन शेख)

बुलढाणा : १२ मे रोजी अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील रोहडा येथील रहिवासी राधिका आपल्या आई वडिलांसोबत तपोवन देवी संस्थान येथे लग्नासाठी गेली असता, त्याच दिवशी सकाळी ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. व ती घटना वार्‍यासारखी संपुर्ण जिल्ह्यात पसरली.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दखल घेत शोधमोहीम सुरु केली. मात्र तिचा काही शोध लागला नाही. संध्याकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्ती विरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १३ मे रोजी दुपारच्या म्हणजेच दुसर्‍या दिवशी तपोवन देवी मंदिराच्या पाठीमागील डोंगराळ भागात चिमुकली राधिकाचा मृतदेह सापडला. मृतदेह पाहूण सर्व हैरान झाले कि राधिकाची अशी अवस्था कोणी केली. कारण तिचा मृतदेह दगडाची पाळ रचलेली होती व रुमालाने गळा आवळून खून झाल्या सारखे वाटत होते. खून करणारा कोण? व कशासाठी?

अशे अनेक प्रश्न पोलीसांसमोर आवाहन बनून समोर येत होते. तर काही राजकीय नेत्याकडून व गावकर्‍यांकडून राधिकाला न्याय मिळवण्यासाठी चिखली बंदची हाक पुकारण्यात आली. व सर्वांमध्ये तिव्र राग निर्माण झालेला होता. पोलीसांसमोर हे मोठे आवाहन होते. स्व:ता जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने तपासवर लक्ष देऊन मार्गदर्शन करत होते. परंतु पोलीसांना त्या ठिकाणी काहीच पुरावा मिळालेला नव्हता. त्या परिसरातील सीसीटीव्ही सुद्धा बंद पडलेले होते.

पोलीसांना वेगवेगळ्या लोकांवर, नातेवाईंकावर संशय येत होता. पोलीसांचे तपास चक्र अधिक गतीने फिरत होते. दरम्यान शवविच्छेदनाच्या रिपोर्टात राधिकावर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली. तेव्हा पोलीस प्रशासनाच्या तपासाची दिशाच बदलली. सर्वकडे विचारपुस करुन शेवटी मंदिरासमोेर नारळ व पुजेचे सामान विकाणार्‍यांना बोलावून विचारपूस केली असता सदानंद भगवान रोडगे या तरुणावर पोलीसांचा संशय गेला. कारण त्याच्या चेहर्‍यावर नखाचे व्रण पोलीसांना दिसले.

पोलिसांनी विचारपुस केल्यास वेगवेगळे उत्तर देऊ लागला. नंतर पोलीसांनी त्याच्या भाषेत विचारपूस केली असता, सदानंद पोपटासारखा फळफळ बोलू लागला. सदानंदने स्व:ताच त्या मुलीवर अत्याचार करुन तिचा गळा दाबून खून केल्याची कबूली दिली. शेवटी पोलीसांनी आपले कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे बजावले आहे. या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांच्यासह पोलीस पथकाने केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!