Saturday, June 13, 2026
HomeUncategorizedसाजिद खान पठाण यांना ‘बेस्ट आमदार’ पुरस्कार, विकासकामांच्या पाठपुराव्याची दखल; विविध क्षेत्रांतून...

साजिद खान पठाण यांना ‘बेस्ट आमदार’ पुरस्कार, विकासकामांच्या पाठपुराव्याची दखल; विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव

(मतीन शेख)

अकोला: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना ऑल इंडिया लूक लाईक असोसिएशनतर्फे ‘बेस्ट आमदार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान (ज्युनिअर अनिल कपूर) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. अकोला पश्चिम मतदारसंघातील विविध विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तसेच सर्वसमावेशक विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. आमदार साजिद खान पठाण यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, रस्ते आणि पाणीपुरवठा यांसारख्या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी त्यांनी विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केला. तसेच उर्दू घर उभारणीसाठी निधी मंजूर करून घेण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. विविध प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडून विकासकामांना गती देण्याचे काम आमदार पठाण यांनी केल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आमदार साजिद खान पठाण म्हणाले, “हा सन्मान माझ्यासह अकोला पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक नागरिक, कार्यकर्ता आणि मतदारांचा आहे. जनतेने दाखविलेला विश्वास कायम राखत विकासकामांचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.” यावेळी अकोला गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सचिव जावेद खान, माजी नगरसेवक मो. इरफान, नगरसेवक गुड्डू पठाण, जावेद जकारिया, हाजी मतीन, आर्किटेक्ट सोहेल खान, मंजूर अहमद, इकबाल सूर्या, रिजवान खान, सोहेल खान पठाण, सैय्यद अहमद यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या पुरस्कारानंतर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून आमदार साजिद खान पठाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!