Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedशिवजयंतीपूर्वी बावनबीरमध्ये शांततेचा निर्धार; सोनाळा पोलिस ठाण्यात शांतता समिती बैठक

शिवजयंतीपूर्वी बावनबीरमध्ये शांततेचा निर्धार; सोनाळा पोलिस ठाण्यात शांतता समिती बैठक

 

(मतीन शेख)

संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात आगामी ६ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दि.४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सदर बैठक सोनाळा पोलिस ठाण्यात घेण्यात आली. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गावात पुन्हा सलोखा व समन्वय राखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. दोन्ही समाजातील नागरिक, पदाधिकारी व प्रतिष्ठित व्यक्ती या बैठकीस उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी मलकापूर आनंद महाजन यांनी शिवजयंती उत्सव शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली. बैठकीस सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनीही मार्गदर्शन करत मिरवणुकीदरम्यान नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. कोणतीही अफवा पसरवू नये आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश टाळावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीचा शेवट शांततेचा आणि सामाजिक ऐक्याचा संकल्प व्यक्त करून करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!