Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedमाजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न; इंदिरा गांधी विद्यालय बावनबीर येथे २३ वर्षांनंतर...

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न; इंदिरा गांधी विद्यालय बावनबीर येथे २३ वर्षांनंतर भावनिक पुनर्मिलाप

 

(मतीन शेख)

 

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील इंदिरा गांधी विद्यालय, बावनबीर येथील इयत्ता १० वी बॅच २००३ च्या माजी विद्यार्थ्यांचा एक दिवसीय स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल २३ वर्षांनंतर एकत्र येत विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत “शाळा शिकूया… पुन्हा लहान होऊया” हा उपक्रम आनंदात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेकांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव कथन करत जुन्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधला. या स्नेहमेळाव्यात योगेश पुंडे, अमोल काळमेघ, दर्शन अग्रवाल, शिवा मोरे, मंगेश खानजोड, अनिल सोळंके, वासुदेव कल्याणकर, नारायण आमटे, गणेश ढोकणे, तुलसीदास सोनट्टके, संदीप लेकुरवाडे, निलेश नथपाटील, गजानन कुचेकर, दिलीप डुब्बल, दिनेश भगत, संतोष इलामे, शिवाजी कुचेकर, ज्ञानेश्वर ढोले, योगेश इलामे, पवन वडनेरकर, राजु मारोडे, आनंद माळोकार, निलेश हागे, कैलास गायकवाड, गोपाल मनसटे, गणेश हागे, विजु आमटे, माणिक पाटील, मंगलसिंग राठोड, संतोष तायडे, अर्जुन बोदडे, संतोष घायल व अभिमन्नू हागे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक उपक्रम, खेळ आणि सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्वांनी भविष्यातही अशा भेटीगाठी नियमितपणे आयोजित करण्याचा संकल्प केला. हा स्नेहमेळावा मैत्री, आपुलकी आणि शालेय बंध दृढ करणारा ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!