Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedशेगावमध्ये संत नगरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच रुग्णसेवेत, मेगा भरतीची सुरुवात; विविध पदांसाठी...

शेगावमध्ये संत नगरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच रुग्णसेवेत, मेगा भरतीची सुरुवात; विविध पदांसाठी वॉक-इन मुलाखत

 

(मतीन शेख)

 

बुलढाणा : शेगाव शहरातील वाटीका परिसरात गौलखेड रोडवर उभारण्यात आलेले संत नगरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच रुग्णसेवेत दाखल होणार असून, हॉस्पिटलच्या विविध विभागांसाठी मेगा भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. शेगाव व परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही भरती राबविण्यात येत असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रविण पाटील यांनी दिली. या भरतीसाठी रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हॉस्पिटल कॅम्पसमध्ये वॉक-इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीमध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, रेसिडेन्स डॉक्टर, फार्मासिस्ट, मेट्रन, नर्सिंग स्टाफ, ओटी असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, क्लार्क/अकाउंटंट, रिसेप्शनिस्ट, कम्प्युटर ऑपरेटर, फ्लोअर सुपरवायझर, वॉर्ड बॉय, वॉर्ड आया, हाऊसकीपिंग कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक अशा विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रत, अनुभव प्रमाणपत्रे, बायोडाटा व पासपोर्ट फोटो घेऊन थेट मुलाखतीस उपस्थित राहावे. तसेच अर्ज १४ फेब्रुवारीपर्यंत

ई-मेल : snmhshegaon@gmail.com या पत्त्यावर पाठवावा.

अधिक माहितीसाठी डॉ.समीर – ९४२०९३९६२० किंवा श्री.उमेश – ९९२३६०६२८४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संत नगरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच सेवेत दाखल होत असल्याने शेगाव परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सुसज्ज आरोग्य सुविधा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!