Sunday, November 22, 2026
HomeUncategorizedसोनाळा पोलिसांची धडक कारवाई; विनापरवाना देशी दारू वाहतूकप्रकरणी दोघांना अटक, १ लाख...

सोनाळा पोलिसांची धडक कारवाई; विनापरवाना देशी दारू वाहतूकप्रकरणी दोघांना अटक, १ लाख २ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

 

(मतीन शेख)

 

बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत पोलिसांनी विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करून एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दखलपात्र कायम गुन्हा क्रमांक ४१/२०२६ अंतर्गत, कलम ६५ (अ)(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये करण्यात आली आहे. फिर्यादी म्हणून पोलीस हवालदार राहुल रमेश पवार पोलीस स्टेशन सोनाळा यांनी तक्रार दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ओंकार पुंडलीक फुन्से वय ५३ व लोकेश रमेश सुलताने वय २९ अशी असून दोघेही रा.जामोद ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथील रहिवासी आहेत. दि.९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास टुनकी ते लाडणापूर रोडवर पोलिसांनी प्रोव्ही रेड कारवाई केली. यावेळी आरोपी विनापरवाना देशी दारूची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. कारवाई दरम्यान निळसर रंगाच्या दोन थैल्यांमध्ये बिग बॉस कंपनीची ९० मिली क्षमतेची देशी दारूचे ८ बॉक्स जप्त करण्यात आले. प्रत्येक बॉक्समध्ये १०० शिश्या असून एकूण ८०० शिश्या हस्तगत करण्यात आल्या. प्रत्येकी ४० रुपये दराने या दारूची किंमत ३२ हजार रुपये आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली विना नंबरची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोसा दुचाकी अंदाजे किंमत ७० हजार रुपये जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख २ हजार रुपये आहे. ही संपूर्ण कारवाई ठाणेदार सपोनि संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महादेव खोने, पोहेका विनोद वानखडे, विनायक इंगळे, राहुल पवार व लक्ष्मण डोके यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विनोद वानखडे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!