Monday, November 23, 2026
HomeUncategorizedसंग्रामपूर तालुक्यात पत्रकार दिन साध्या पद्धतीने साजरा; स्व. केशवराव घाटे यांना श्रद्धांजली 

संग्रामपूर तालुक्यात पत्रकार दिन साध्या पद्धतीने साजरा; स्व. केशवराव घाटे यांना श्रद्धांजली 

 

(मतीन शेख)

संग्रामपूर: आधुनिक मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन ६ जानेवारी रोजी संग्रामपूर तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. येथील रेणुका माता मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वर्गीय केशवराव अण्णा घाटे यांच्या निधनाबद्दल पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व उपस्थित पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, भाऊ भोजने, प्रल्हाद दातार, प्रल्हाद सावतकर, भगवान पाखरे आदींनी मनोगत व्यक्त करत बाळशास्त्री जांभेकर तसेच स्वर्गीय केशवराव घाटे यांच्या पत्रकारितेतील योगदानावर प्रकाश टाकला. ज्येष्ठ पत्रकार केशवराव घाटे यांचे याच वर्षी वृद्धापकाळाने निधन झाल्याने यंदा सातपुडा व अन्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. स्वर्गीय केशवराव घाटे यांच्या निधनानंतर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदावर सर्वानुमते लवकरच नव्या अध्यक्षाची निवड करण्यात यावी, अशी सूचना ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद दातार व रामेश्वर गायकी यांनी व्यक्त केली. यानंतर येथील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते विलासराव देशमुख यांच्या हस्ते स्वर्गीय केशवराव घाटे यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. तसेच पत्रकार भवनातील सभागृहास स्वर्गीय केशवराव घाटे यांचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमास भाऊ भोजने, प्रल्हाद सावतकर, प्रल्हाद दातार, युसुफ शेख, नारायण सावतकर, रामेश्वर गायकी, काशिनाथ मानकर, दयालसिंग चव्हाण, नंदकिशोर शिरसोले, सतीश वानखडे, रवी शिरस्कार , संतोष आगलावे, पंजाबराव ठाकरे, रवींद्र दांडगे, महेश घाटे, सचिन पाटील, सेवा निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. सहदेवराव गोतमारे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण सावतकर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!