Sunday, December 28, 2025
HomeUncategorizedपळशी (झाशी) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत अंगणवाडी मध्ये स्नेहसंमेलन; ८० विद्यार्थ्यांना...

पळशी (झाशी) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत अंगणवाडी मध्ये स्नेहसंमेलन; ८० विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

 

(मतीन शेख)

बुलढाणा: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी अंगणवाडी केंद्रामध्ये दि.२७ डिसेंबर रोजी स्नेहसंमेलन व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमामध्ये स्वच्छता या विषयावर विशेष भर देण्यात आला. पालक मेळाव्याच्या निमित्ताने सरपंच व उपस्थित मान्यवरांनी गावातील स्वच्छतेचे महत्त्व विशद करत स्वच्छ व सुंदर गाव निर्माण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका शिक्षण विस्तार अधिकारी गौतमराव मारोडे उपस्थित होते. यावेळी गौतमराव मारोडे यांनी स्वच्छतेसह गावात सुरू असलेल्या विविध सकारात्मक उपक्रमांचे कौतुक करत ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते एकूण ८० विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास उपसरपंच पंचफुलाबाई पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, करुणानंद तायडे, सुजित बांगर, शाळा समिती अध्यक्ष गिरीताई, उपाध्यक्ष चितोडे ताई, सुधाकर भाऊ शिरसोले, ज्ञानेश्वर भाऊ मारोडे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस आमले मॅडम, पूजाताई मारोडे, कल्पनाताई चितोडे, बेबीताई खुमकर, करांगडे मॅडम, उज्वलाताई बांगर, गवई मॅडम, अनिताताई बन्नतकार यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!