Wednesday, December 17, 2025
Homeनेशनल न्यूज़पातुर्डा गावात भव्य रोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन

पातुर्डा गावात भव्य रोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन

(मतीन शेख)

बुलढाणा : संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा बु येथील सेवा निवृत्त मुख्यध्यापक फकिरचंदजी राठी यांच्या प्रथम स्तृतीदिना निमित्त श्री रामदेव बाबा दर्शन सेवा समिती संग्रामपुर जळगाव जा तालुका व राठी चौधरी परिवार पातुर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन दि. २५ जुलै गुरुवार रोजी दुपारी १ ते ३ वाजे दरम्यान तर रोगनिदान शिबीर दुपारी ३ ते ६ वाजे पर्यत सरस्वती वाचनालय सभागृह बालाजी मंदिर जवळ पातुर्डा येथे करण्यात आले आहे. भव्य रोगनिदान शिबीरात जे.जे. हॉस्पीटचे त्वचा रोग सौदर्य तज्ञ डॉ. प्रफुल वाघाडे, स्त्रिरोग वंध्यत्व निवारण तज्ञ अकोला डॉ मनिषा कासट राठी, दत्तरोग अस्थमा ॲलर्जी तथ डॉ. राम देवळे, फिजीशीयन हृदयरोग, मधुमेह तज्ञ डॉ धनंजय मारोडे, भव्य रोग निदान शिबीरात तज्ञ डॉक्टर तपासणी करुन मार्गदर्शन करणार आहे. पातुर्डा परिसरातील गरजु रुग्णांनी रोगनिदान व रक्तदान शिबीराचा लाभ घ्यावा. तसेच गोर गरिब गरजु रुग्णासाठी रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन स्व:ईच्छेने रक्तदान करावे असे आव्हान श्री रामदेव बाबा दर्शन सेवा समिती संग्रामपुर जळगाव जा तालुका व राठी चौधरी परिवाराच्या वतीने प्रसिद्ध पत्रका व्दारे केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!