(मतीन शेख)
तालुक्यातील कोलद गावालगत वान नदीपात्रात दि. १६ जुलै रोजी सकाळी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळखळ उडाली आहे. या प्रकरणी तामगांव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घातपात की आत्महत्या याबाबत अंदाज वर्तविले जात आहे. सविस्तर वृत्त अशे की, कोलद गावालगत दक्षिण दिशेला वान नदी पात्रातील एका खड्डयात रेती मिश्रीत दगडांनी झाकलेल्या अवस्थेत अत्यंत कुजलेला मानवी मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाचा चेहरा व पायचे बोट दिसून राहीले एवळी जागा उघडी पडली होती. त्या वरून नदी मध्ये अज्ञात इसमाचे मृतदेह असल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावातील सरपंच यांनी घटनेची माहिती ठाणेदार यांना दिली. माहिती प्राप्त होताच तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळावर वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय चमुला पाचरण करण्यात आले. दुपारी दोन वाजता वैद्यकीय चमु घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाला नदी पात्रातील खड्डयातून वर काढून शवविच्छेदन करण्यात आले. तसेच मृतकाच्या शर्टच्या कॉलर वर कुले टेलर दानापूर अशे लिहले आहे. पोलीस दानापूर गावातील किंवा गावालगत खेड्या पाड्यातील कोणता इसम बेपत्ता आहे का याचा शोध घेत आहे. दरम्यान मृतदेहाला नदीपात्रातील खड्डयात ३ ते ४ दिवसांपूर्वी झाकण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परिसरात उलट सुलट चर्चांना वेग आला असून घातपात घडवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. घटनास्थळावर तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार, बिट जमदार अशोक वावगे यांच्यासह ईतर पोलीस कर्मचारी ठाण मांडून आहेत. पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहे.