(मतीन शेख)
अकोला : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडली बहिण योजनाची घोषणा केली आहे. या योजनेसाठी सर्व माता-भगिनीं आप आपल्या परीने कागदपत्र गोळा करण्यासाठी धाव पळ करतांना दिसत आहेत. ही योजना १ जुलै पासून सुरु झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफ लाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी १५ दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. परंतु आता नोंदणीचा कालावधी दोन महिने करण्यात आला आहे. या योजनेसाठी लागणारे कागदपत्र किंवा इतर योजनेच्या लाभासाठी लागणारे कोणतेही कागदपत्र शासकीय कार्यालया मधून काढून देण्यासाठी कोमत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला येथील खालील क्रमांकावर संपर्क साधावा अशे आवाहन एसीबी अकोला यांच्या कडून करण्यात आले आहे.
सचिन सावंत पोलीस निरीक्षक- ८८५५८३०८३०
नरेंद्र खैरनार पोलीस निरीक्षक-९१३००१९०७७
ऑफिस फोन नं. ०७२४-२४१५३७०
टोल फ्री नंबर १०६४
Shere Ali chowk junagaon Buldhana Moti masjid