Friday, December 12, 2025
Homeनेशनल न्यूज़एसटी बस पेटता पेटता वाचली, प्रवाशी सुद्धा बचावले! खामगाव ते शेगाव रोडवरील...

एसटी बस पेटता पेटता वाचली, प्रवाशी सुद्धा बचावले! खामगाव ते शेगाव रोडवरील घटना

(मतीन शेख)

बुलढाणा: खामगाव वरुन सुटणारी व शेगाव येणाऱ्या भंगार बसची डिझेल टँक जवळीच वायरिंग जळाल्याने जोरदार धुर निघून पेट घेत असतांना एक प्रवासी व वाहकाने प्रसंगावधान साधून प्रवाश्यांसह बस वाचल्याची घटना समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की, दि.१३ जानेवारी रोजी दुपारी ४ वा. खामगाव आगाराची बस क्र. एमएच ४० वाय ५४०१ खामगाव येथून शेगाव कडे येत होती. दरम्यान जयपूर लांडे महामार्ग पुलाजवळ बसची वायरिंग जळत असतांना जोरदार धुर व वास येत असल्याने सर्व प्रवाश्यांना तातडीने उतरुन दिले. अन खालून पेट घेतला असता सुटाळा (खामगाव) चे एख तरुण प्रवासी किशोर मोरे यांनी बस वाहकास वायरिंग जळत असता गॕस पंप मागितला व स्वतः आणि बस वाहक नितेश नांदोकार यांनी पेट घेतांना विझवली. विशेष म्हणजे सदर बसवर चालक म्हणून भावना जाधव होत्या. तर जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी सह २०ते २५ प्रवासी होते. थोडक्यात पेटता पेटता भंगार बससह प्रवाशी वाचले व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 

 एस.टी. महामंडळाचा दिवंसे दिवस गलथान कारभार व ढिसाळ पणामुळे दररोज बुलढाणा जिल्ह्यात विशेषतः खामगाव, शेगाव, जळगाव(जामोद) आगाराच्या एवढ्या भंगार बसेस आहेत की दररोज रोडवर बंद पडतात व जागेवर उभ्या कराव्या लागतात. अनेक बसगाड्या ह्या मुदत बाह्य असून त्या चालवल्या जात आहेत. ह्यामुळे एखादेवेळी अपघात होवून जिवीतहानी होवू शकते. रस्त्यावर बसेस बंद पडल्याने दुसरी बस येईपर्यंत ताटकळत बसावे लागते. दुसरी बस आलीतर खचाखच भरुन येते. ह्यामुळे प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागतो. कितीही ओरड झाली तरी एसटी बस मंडळाचे अध्यक्ष, राज्यकर्ते व वरीष्ठांची कुंभकर्णी झोप उघडत नाही. ब्रिद वाक्य “एस टी बस प्रवास म्हणजे “एस टी महामंडळ स्वतः हिताय अन् बहुजन दुखाय” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!