(मतीन शेख)
बुलढाणा : भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या शिष्टमंडळाकडून संग्रामपूर पंचायत समिती येथे आज दि.२४ डिसेंबर रोजी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. गटविकास अधिकारी उपस्थित नसल्यामुळे पंचायत समिती प्रशासन अधिकारी थिटे व बावनबीर सर्कल अधिकारी सोनवणे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये म्हटले आहे की, मागील १६ डिसेंबर रोजी कोलद ग्रामपंचायत अंतर्गत मोदी आवास योजनेतील २०२१ ते २०२२ मधील घरकुल लाभार्थी यांनी घरकुल बांधकाम न करता परस्पर एक एक लाख असे दोन लाख रुपये रोख रक्कम काढून शासनाची दिशाभूल केली असल्याची तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष यांनी दिली. परंतु आज रोजी पर्यंत कोणतीही कार्यवाही गटविकास अधिकारी यांनी केलेली नसल्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून थेट आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून म्हटले आहे की, तात्काळ या दोन दिवसात कोलद या गावातील संबंधित सरपंच, ग्रामसेवक किंवा पंचायत समिती अंतर्गत असलेले अधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळेस भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण भिकूसिंग राठोड, अभिमन्यू रामेश्वर वानखडे जिल्हाध्यक्ष, निर्मला भीमराव वाघ जिल्हा उपाध्यक्ष महिला, देवराव शामराव सोळंके संग्रामपूर तालुकाध्यक्ष, व्यंकटेश शामराव ताडे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष, शेख कदिर भाई शेख दस्तगीर उपजिल्हा संपर्कप्रमुख, सुनील बाबुराव उन्हाळे शेगाव तालुका अध्यक्ष, सौ.मंगला सुभाष गर्दे नांदुरा तालुका अध्यक्ष महिला, श्रीमती गोदावरी जगदाळे नांदुरा शहराध्यक्ष महिला व अजहर मोहम्मद संग्रामपुर तालुका सचिव इत्यादी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शिष्टमंडळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दलनात उपस्थित होते.