(मतीन शेख)
बुलढाणा : २२ जुलै रोजी अंबाशी येथील १० वर्षीय चिमुकला हरवल्याची चर्चा सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. चिखली पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा नोंदवीण्यात आला होता. दरम्यान चिखली पोलिसांनी तपासचक्र फिरवून त्या मध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबाशी येथील त्या १० वर्षीय अरहानचा सख्ख्या आतेभावानेच दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खुन करून त्याचा मृतदेह पोत्यात टाकून बाजूच्या परिसरात शेणामध्ये पुरवून ठेवले होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. काल २३ जुलैच्या रात्री या प्रकरणाचा उलगडा झाला. शेख शाकीर शेख मुन्ना वय २२ अशे या आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली असून तो अंबाशी गावातीलच रहिवासी आहे. अन्सार ने चिमुकल्याचा खून का केला या मागचे कारण स्पष्ट झाले नसून चिखली पोलीस तपास करीत आहे.