(कुशल चौधरी-जिल्हा प्रतिनिधी)
अजनगांव सुर्जी येथील माहिती अधिकारात तक्रारदाराने जी माहिती मागितली ती देण्याबाबत राज्य माहिती आयोगाने दिलेल्या आदेशाला येथील नामांकित सीताबाई संगई संस्थेच्या अध्यक्षांने चक्क केराची टोपली दाखवल्याची संस्थेतील कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु असेल. आता राज्य माहिती आयोग याबाबत काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याबाबत माहिती अशी की, स्थानिक सीताबाई संगई संस्थेमध्ये अनेक गोंधळ असून मोठ्या प्रमाणात खोटी कामे सुद्धा आहे. या संस्थेतील अनेक कारनामे येथील पत्रकार कुशल चौधरी हे बाहेर काढत आहेत. या संस्थेतील गैर कारभाराच्या अनेक तक्रारी कुशल चौधरी यांनी शासनाकडे तसेच शिक्षण विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. अनेक प्रकारची गैर कारभाराची माहिती कुशल चौधरी यांनी माहितीच्या अधिकारात विचारली असता प्रत्येक वेळी टाळाटाळ करणे, चुकीची माहिती देणे, माहिती पाहिजे ती न देता वेगळी माहिती देणे, तर कधी आमची संस्था ही अल्पसंख्यांक संस्था असल्याने आम्हाला माहितीचा अधिकार लागू होत नाही अशा प्रकारचे संबंधित तक्रार कर्त्याला उत्तरे देऊन सदर संस्था तक्रार कर्त्याला योग्य माहिती देण्यास पद्धतशीरपणे टाळाटाळ करीत होती. याबाबत तक्रारकर्ता कुशल चौधरी यांनी संबंधित बाबीची रीतसर तक्रार राज्य माहिती आयोगाकडे केली. त्यानुसार राज्य माहिती आयोगाने तक्रार कर्ता त्याने विचारलेली माहिती देण्याचे आदेश दिले. त्यावरून दिनांक ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता दस्तऐवज घेऊन हजर राहण्यासंबंधी कुशल चौधरी यांना सदर संस्थेने रजिस्टर पत्र पाठवले होते. त्यानुसार तक्रार कर्ता कुशल चौधरी आपले सर्व दस्तऐवज घेऊन ५ जुलै दुपारी साडेतीन वाजता हजर झाले असता त्या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यावेळी संस्थेच्या कामावरील एक कर्मचारी माहिती देण्यास ठेवला असल्याचे कुशल चौधरी यांना दिसून आले. संस्थेचे जबाबदार पदाधिकारी मात्र त्यावेळी हजर नसल्याने आढळून आले. सदर संस्था वारंवार संस्थेतील सत्य माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून राज्य माहिती आयोगाच्या आदेशाला सुद्धा जुमानत नसल्याने तक्रार कर्ता कुशल चौधरी आता पुन्हा राज्य माहिती आयोगाकडे रीतसर अपील दाखल करणार असून आता या संस्थेबाबत राज्य माहिती आयोग काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.