(मतीन शेख)
बुलढाणा : पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून मिशन परिवर्तन अंतर्गत पोलीस स्टेशन सोनाळा मार्फत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेखी सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा रविवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता आदिवासी विद्यालय, टुनकी येथे घेण्यात येणार आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शन ठाणेदार संदीप काळे करणार असून, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. सराव परीक्षेत पहिले, दुसरे व तिसरे क्रमांक पटकावणाऱ्या परीक्षार्थींना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी पोलीस कॉन्स्टेबल तितरे यांच्याशी मोबाईल क्रमांक 89 75 52 45 57 वर संपर्क साधावा.