(मतीन शेख)
बुलढाणा : MCN न्युज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार रा. वानखेड ता. संग्रामपूर यांच्या एसबीआय बँक खात्यातून ५ महिन्यापूर्वी कपात झालेली ५०,००० रू.ची रक्कम सायबर पोलिस दल बुलढाणा सेशन कोर्ट तसेच स्टेट बँक संग्रामपूर यांच्या सकारात्मक पाठपुराव्याने नुकतीच आज दीं.४ जानेवारी रोजी परत जमा करण्यात आली आहे .याबाबात MCN प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार यांच्या सोबत घडले असे की असे की त्यांना व्हॉटसअप वर आलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या बनावट लिंकवर त्यांच्याकडून बँकेचे ॲप समजून अनावधानाने क्लिक झाल्याने त्यांच्या करंट खात्यातून लागोपाठ १५ हजार आणि ५ हजार असे चार एसएमएस त्यांच्या मोबाईल वर आले.. आपला मोबाईल हॅक झाला लक्षात येताच त्यावर क्षणात त्यांनी सायबर हेल्पलाईन नंबर १९३० वर केलेल्या दूरध्वनीच्या संपर्क तक्रारीत हॅकरचे खाते गोठवन्याची प्रक्रिया करण्यांत आली.. दुसऱ्या दिवशी तत्कालीन पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या सहकार्याने बुलढाणा सायबर पोलीस दलातील राजदीप वानखडे यांच्याशी संपर्क केला . त्यांच्या कडून मिळालेल्या निर्देशानुसार एडवोकेट शुभम टेंभे खामगाव यांच्या मार्फत बुलढाणा कोर्टात प्रकरण दाखल केले..
कोर्टासमोर सादर केलेली कागदपत्रे व पुरावे दरम्यान ५ महिन्यानंतर बुलढाणा सेशन कोर्टाकडून फिर्यादी रवींद्र शिरस्कार यांच्या बाजूला निकाल लागला.. स्टेट बँक संग्रामपूर रजिस्टर मेल आयडी वर आलेल्या कोर्टाच्या निकाली प्रकरणाचा आदेशाला दुजोरा देत संग्रामपूर स्टेट बँकचे ब्रांच मॅनेजर संदेश मगरे यांनी सायबर नोडल ऑफिस मुंबई शाखेच्या निदर्शनात आणत अखेर आज दीं.४ जानेवारी रोजी हॅकरच्या होल्ड लावलेल्या खात्यातील खात्यात रक्कम वजा करत रवींद्र शिरस्कार यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.