(मतीन शेख)
बुलढाणा : गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करून जास्त नफा कमवण्याच्या मानसिकतेमुळे अवैद्य धंद्याकडे अनेक तरुणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत तालुक्यात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. तरुणांची अवैध धंद्याकडे वाढलेली कल आणि पोलीस प्रशासनाचे कडून दिलेली सूट म्हणजेच दुर्लक्ष यामुळे अवैध धंधा करणाऱ्या मालकांना जणू काही मोकळे रानचं मिळाले आहे. दरम्यान संग्रामपूर तालुक्यात अवैध धंद्याचा सुद्धा पुर आलेला दिसत आहे. तामगावं पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कवठळ, पातूर्डा, वरवट बकाल या सारख्या अनेक गावात रस्त्यावर खुलेआम वरली मटक्याची दुकानें थाटलेली दिसत आहे. मात्र पोलीसांकडून या सर्व बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. अवैध धंद्याविरोधात मागील काही दिवसापूर्वी एक उपोषण सुद्धा करण्यात आले होते. परंतु ३ दिवस उपोषणास बसून सुद्धा काहीच उपयोग झालेला नाही. वरली मटका, अवैध दारू या सारखे धंदे सर्रासपणे सुरु आहेत. मात्र पोलीस प्रशासन दुर्लक्ष का करत आहे? कुठं तरी पाणी मुरत आहे का? अशे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहे. वरलीमुळे अनेकांचे घर संसार उघड्यावर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये पोलिसांविरुद्ध नाराजीचा सुरु उमटत आहे. पोलीस प्रशासनाने या अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.