(मतीन शेख)
संग्रामपूर: वरवट बकाल येथे शिक्षक सोसायटीचे सभागृहात व्हाईस ऑफ मिडीयाची संग्रामपूर तालुकास्तरीय बैठक दि.२२ जानेवारी रोजी संपन्न झाली. ह्या बैठकीत तालुका अध्यक्षपदी लोकमतचे युवा पत्रकार नारायण सावतकार, कार्याध्यक्षपदी श्याम देशमुख, सचिवपदी मिर मकसुदअली तर डिजीटल तालुका अध्यक्षपदी दयालसिंग चव्हाण ह्यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा अध्यक्ष कृष्णा सपकाळ, जिल्हा सचिव सुनिल तिजारे हे होते. प्रमुख आतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रल्हाद दातार, विदर्भ पदाधिकारी जेष्ठ भाऊ भोजने, जिल्हा संघटक काशीनाथ मानकर, किशोर खडे, सागर कापसे, ता. अध्यक्ष आकाश पालीवाल, खामगावचे नाना सौदागर होते. प्रथम प्रल्हाद दातार यांनी प्रातविकातून ह्या संघटनेचे कार्य व जिल्हा व महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय कार्य असून पत्रकाराचे हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानंतर भाऊ भोजने यांनी आपले मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. ह्यावेळी जिल्हाअध्यक्ष कृष्णा सपकाळ, जिल्हा सरचिटणीस सुनिल तिजारे यांनी व्हाईस ऑफ मिडीया विषयी संपूर्ण सखोल मार्गदर्शन करुन पदाला महत्त्व नाही तर कामाला महत्त्वाचे आहे असे सांगितले. संघटनेतील सर्वच अध्यक्ष व सचिव असून सर्वांनी एकजुटीने काम कराव अस आवाहन केले. उर्वरित विविध पदाधिकारी यांची निवड जाहीर करण्याचे सांगितले. ह्याच वेळी साबीर अली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शेवटी अध्यक्षीय भाषणातून जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी म्हणाले सर्व मतभेद सारुन तालुक्याचे दृष्टीने एकसंघ व एकजुटीने सर्वांनी काम कराव व आपलही हित साधण्यासाठी व्हाईस ऑफ मिडीयात सहभागी व्हावं. यावेळी जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने, काशिनाथ मानकर, अजहर अली, किशोर खडे, सुचित धनभर, शेख अब्दुल, विवेक राऊत, मतीन शेख, नंदू शिरसोले, युसूफ शेख, ज्ञानेश्वर दांदडे, स्वप्नील देशमुख, विवेक राऊत, संतोष आगलावे, शेख कदीर, साबीर खान, अशोक आकोटकार यांच्या सह संग्रामपूर तालुक्यातील ३० ते ३५ पत्रकार बांधव या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नारायण सावतकार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्याम देशमुख यांनी केले.