(मतीन शेख)
बुलढाणा : जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात तामगाव पो. स्टेशन मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दि. १७ जुलै रोजी निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त अशे की, कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गाजापुर येथे अतिक्रमण हटवण्याच्या नावावर काही समाजकंटकांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात कोणतीही परवानगी नसतांना १४ जुलै रोजी मोर्चा काढला होता. या मोर्च्यात दरम्यान गाजापुर गावाचा व विशालगड अतिक्रमण या कोणताही संबंध नसतांना गाजापुर गावातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर अत्यंत हृदयद्रावक हल्ला केला. मोर्चा काढण्यात अगोदर तेथील मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रशासनाकडे विनंती केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून योग्य सुरक्षा पुरवली नाही. याचा परिणाम असा झाला की, मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्या समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मस्जिद, दर्गा, मोटरसायकल, चारचाकी वाहन आणि घरांची तोडफोड केली. तसेच लहान मुलांना आणि महिलांना मारहाण सुद्धा करण्यात आली. या हिंसाचारात मोर्चात सहभागी सर्व गुंडांना अत्यंत अमानवी वर्तन केले. त्यामुळे या घटनेची सकल चौकशी करून छत्रपती संभाजी राजे व त्यांच्या सोबतच्या गावगुंड्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांना त्वरित अटक करून न्यायालयीन प्रक्रिया चालवावी आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. निवेदनावर अब्दुल हमीद, शेख इस्राईल, वसीम खान, तौसिफ जमदार, शेख नईम, शेख रशीद, अब्दुल खलिक, शेख सिद्दीक कुरेशी रियाज कुरेशी, अकरम खान, अब्दुल अजीम, मुनीर खान अशे अनेक मुस्लिम बांधवांच्या सह्या आहेत.