Monday, December 29, 2025
Homeनेशनल न्यूज़मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मार्फत देश परदेश शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज...

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मार्फत देश परदेश शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजनेचा विद्यार्थीनी लाभ घ्यावा; हाजी मुज़म्मील खान 

(मतीन शेख)

 

बुलढाणा : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यार्दीत मुंबई मार्फत अल्पसंख्यांक समाजातील होतकरु गरजु विद्यार्थ्यासाठी राज्यशासना करवी भाग भांडवल स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतुन राज्य शासन मौलाना आझाद शैक्षणीक कर्ज योजना राबविण्यात येते व राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास वित्त विभाग दिल्ली यांच्या कडून कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या रकमेतुन डॉ.ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणीक कर्ज राबविण्यात येते दोन्ही शैक्षणीक कर्ज योजने अंतर्गत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यान कडून मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वेब साईटवर जिल्हानिहाय कार्यालय ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा स्विकारण्यात येत असुन मौलाना आझाद शैक्षणीक कर्ज योजना कर्ज मर्यादा ५ लाख पर्यत व्याजदर ३% टक्के, १००% कर्ज, परत फेड शिक्षण पुर्ण झाल्या नंतर ६ महिण्या पासुन पुढील ५ वर्ष कौटुंबीक वार्षीक उत्पन्न ८ लाख पर्यत विद्यार्थी वय १८ ते ३२ वर्ष तर डॉ. ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणीक कर्ज योजने अंतर्गत कर्ज मर्यादा भारतीय शिक्षणा करिता २० लाख पर्यत, परदेशी शिक्षणा करिता ३० लाख पर्यत ( एन एम डी एफ सी ९०% महामंडळ १०%) १००% कर्ज परत फेड शिक्षण पुर्ण झाल्यावर ६ महिण्या नंतर ५ वर्षात करणे अनिवार्य आहे. या साठी कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा शहरभागासाठी १ लक्ष २० हजार पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी ९८ हजार पेक्षा कमी असणे दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनेची अधिक माहिती महामंडळाच्या वेबसाईट पाहणे तसेच मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयशी संपर्क साधुन अल्पसंख्यांक समाजातील गरजु होत करु विद्यार्थ्यानी दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. असे आव्हान मौलाना आझाद विचार मंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष हाजी मुज़म्मील खान यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!