(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपुर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत दि.१६ जुलै मंगळवार रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमरास दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहिती नुसार, सोनाळा-टुनकीच्या मधात असलेल्या एच.पी. राठोळ पेट्रोल पंपावर काम करणारा दत्ता पुरषोत्तम भोंडे हा युवक आपल्या घरी सोनाळा गावाकडे जाण्यास निघाला. तसेच सोनाळ्या वरून एमएच ०२ डीडब्ल्यु ३८८० क्रमांकाचे चारचाकी वाहन टुनकी कडे जात होते. दरम्यान चारचाकी वाहन चालकाने त्या दोनचाकी वाहनास समोरून धडक दिली. त्या धडकेमध्ये दत्ता भोंडे हा रस्त्यावर कोसळला व गंभीर जखमी झाला. तसेच चारचाकी वाहन जाग्यावर सोडुन चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्या वाहनाध्ये फोटो अल्बम व कॅमेरा ठेवलेला होता. या वरून तो फोटोग्राफर असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी सोनाळा येथे पाठविले. रक्त जास्त गेल्याने त्याला उपचारासाठी अकोला येथे पाठण्यात होते. परंतु दत्ता ची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शेवटी त्या युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. मृतक युवकाचे काका रामेश बळीराम भोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात दखलपात्र अहवाल क्र. १८७/२०२४ कलम २८१, १२५(A), १२५ (B), ३२४(४) (५), GB भारतीय न्याय सहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सोनाळा सपोनि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात सोनाळा पोलीस करीत आहे.