(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील कवठळ ते भेडवळ रस्त्यावर पेसोडा फाटा येथे आज दि.१५ जानेवारी रोजी एका मोटार सायकलचा अपघात झाला. त्या अपघातात मोटार सायकल स्वार जागीच ठार झाला आहे. सदर घटना संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. कैलास उकर्डा साबे वय अंदाजे ३२ रा.भेंडवळ अशे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच तामगाव पो.स्टेशनचे पोहेकॉ कोल्हे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतकाचा पंचनामा करून प्रेत श्ववविच्छेदनासाठी वरवट बकाल येथे पाठवण्यात आले आहे. मृतक इसम हा सोमवारी सकाळ पासून घरुन निघुन गेला होता. या बाबत त्याचे वडील उकर्डा साबे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज दि.१५ जानेवारी रोजी बुधवारी सकाळी हरविल्याची तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.