(मतीन शेख)
अकोट: तालुक्यातील मुंडगाव येथे गुप्त माहितीच्या आधारावर अकोट ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून गांजाची विक्री करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे. संतोष जयस्वाल वय ५३ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान घरातील खोलीत १५९४ ग्रॅम असा तब्बल दीड किलोपेक्षा अधिक गांजा आढळला. या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे ३७ हजार ५०० रुपये एवढी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. संतोष जयस्वाल हा घरी गांजा आणून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. घटनास्थळावरून जप्त केलेला गांजा व इतर साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात आले असून आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, पो. उपनिरीक्षक मिनाक्षी काटोले, पोहेकॉ शिवकुमार तोमर, पोहेकॉ निलेश खंडारे , पोकॉ गोपाल जाधव, पोकॉ शैलेश जाधव, पोकॉ शुभम लुंगे, पोकॉ वासुदेव लांडे यांनी केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस पथक करीत आहे.