Saturday, December 13, 2025
Homeनेशनल न्यूज़मराठी पत्रकार परिषद संलग्न संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत; तालुका अध्यक्ष...

मराठी पत्रकार परिषद संलग्न संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत; तालुका अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर दांदळे उपाध्यक्ष शेख अब्दुल, सचिव विवेक राऊत

(मतीन शेख)

बुलढाणा : मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर पाटील दांदळे तर उपाध्यक्ष पदी शेख अब्दुल व सचिव पदी विवेक राऊत यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली. संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा येथे मराठी पत्रकार परिषद मुंबई ची बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी तर सत्कार मूर्ती म्हणून संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष केशव घाटे हे होते.या वेळी रामेश्वर गायकी व केशव घाटे यांचा शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ देऊन मराठी पत्रकार परिषद मुंबई चे चंद्रकांत बर्दे राज्य उपाध्यक्ष, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह राजपूत व त्याच्या सहकारी यांनी केले. या नंतर ब्रम्हांनंद जाधव, चंद्रकांत बर्दे, रणजितसिंह राजपूत यांनी मराठी पत्रकार परिषद मुंबई काय काम करते या बाबतीत सविस्तर माहिती दिली. या नंतर संग्रामपूर तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली या मध्ये संग्रामपूर तालुका अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर पाटील दांदळे, उपाध्यक्ष पदी शेख अब्दुल,सचिव पदी विवेक राऊत यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.निवड होताच चंद्रकांत बंर्दे व रणजितसिंह राजपूत आणि जिल्हा पदाधिकारी यांनी वरील तिघाचे शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. या नंतर सत्कार मूर्ती केशव घाटे व कार्यक्रम अध्यक्ष रामेश्वर गायकी यांनी आप आपली भाषणे दिली व तालुक्यातील आमचे सहकारी काय. कार्य करतात या बद्दल सविस्तर सांगितले. या नंतर उर्वरित कार्यकारणी करण्यात आली या मध्ये कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी, उपाध्यक्ष कासम सुरत्ने, सहसचिव शेख रफिक पन्ना, कोषाध्यक्ष वासुदेव दामधर, तालुका संघटक श्याम इंगळे, संघटक मोहन सोनोने तसेच डिजिटल मीडिया संग्रामपूर तालुका अध्यक्ष गोपाळ धर्माळ, उपाध्यक्ष भगवान पाखरे, सचिव निलेश तायडे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली. सोबत च विभागीय संघटक म्हणून आकाश पालीवाल, डाँ संतोष लांडे, पत्रकार हल्ला कृती समिती मध्ये सागर कापसे, स्वप्नील बापू देशमुख, केंद्रीय जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून श्याम देशमुख, सत्य शोधन समिती जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अजहर अली, जिल्हा समन्वयक म्हणून पंजाबराव ठाकरे यांची नावे या बैठकीतून जिल्हा कार्यकारणी कडे देण्यात आली. राज्याच्या समितीवर रामेश्वर गायकी यांच्या नावाची शिफारस समिती कडे करण्यात आली. जेष्ठ पत्रकार केशव राव घाटे हे मार्गदर्शक म्हणून कामकाज पाहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या वेळी चंद्रकांत बर्दे राज्य उपाध्यक्ष, रणजीतसिंग राजपूत जिल्हाध्यक्ष बुलढाणा, शिवाजी मामतकर जिल्हा सचिव, ब्रह्मानंद जाधव जिल्हा कोषाध्यक्ष, पुरुषोत्तम भातुरकर विभागीय संघटक, जफर शेख शहर सहसंघटक बुलढाणा, प्रमोद कुमार राठोड संघटक, संतोष कुलथे ता.उपाध्यक्ष जळगाव जामोद यांची उपस्थिती होती. कार्यक्रम सूत्र संचालन वासुदेव दामधर यांनी केले. या नंतर स्नेह भोजनाचा स्वाद घेण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!