(मतीन शेख)
बुलढाणा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. या सोडतीस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, तहसीलदार संजय बगाडे आदींसह संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा परिषद गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे👇🏻 :
अनुसूचित जाती — एकूण १२ जागा (सर्वसाधारण ६, महिला ६)
अनुसूचित जमाती — एकूण ३ जागा (सर्वसाधारण १, महिला २)
नागरिकांचा मागास प्रवर्ग — एकूण १६ जागा (सर्वसाधारण ८, महिला ८)
सर्वसाधारण प्रवर्ग — एकूण ३० जागा (सर्वसाधारण १५, महिला १५) अशा प्रकारे एकूण ६१ जिल्हा परिषद जागांसाठी आरक्षणाची सोडत पारदर्शकपणे पार पडली. तसेच सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत देखील याच बैठकीत करण्यात आली. आरक्षण जाहीर होताच तालुका आणि गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, संभाव्य उमेदवारांची चर्चाही सुरू झाली आहे. आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीकडे लागले आहे.