(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यातील पोलीस स्टेशन जानेफळ येथे दाखल गुन्हा क्रमांक २०४/२०२४ अंतर्गत भादंवि कलम ३०२,१२०(ब), ३६४, ३६५, ३४ अन्वये सन २०२४ पासून फरार असलेला आरोपी महादेव दत्तात्रय माळवे रा.बारामती कसबा, जिल्हा पुणे याचा शोध घेण्यात येत होता.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे २४ डिसेंबर रोजी आरोपीस बारामती कसबा येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपीस अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन जानेफळ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार गजानन दराडे, एजाज खान, दिनेश बकाले, युवराज राठोड, पोलीस कॉन्स्टेबल अजीस परसूवाले, ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल पुंड मेजर तसेच टी.ए.डब्ल्यू. पोलीस कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखाच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.