(मतीन शेख)
अकोला : पोलीस म्हटलं की फक्त गुन्हेगारी घटनांचा तपास करणारा, खोळंबलेली वाहतूक सुरळीत करणारा, गुन्हेगारांना वठणीवर आणणारा तर कधी खाकीचा धाक दाखवणारा असाच नजरेसमोर येतो. परंतु अन्यायाने पीडिताचे संरक्षण करण्याबरोबरच ‘रक्तदाना’ च्या माध्यमातून सामाजिक आरोग्याला हातभार लावताना सामाजिक बांधिलकीही ‘पोलीस’ जपत आहेत. ऐकून नवल वाटेल परंतु खरे आहे. आज दि.२ जानेवारी रोजी पोलीस स्थापन दिवसनिमित्त हिवरखेड पोलीस स्टेशन कडून भव्य रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते ३ या वेळेत रक्तदत्यांनी येऊन रक्तदान केले. या शिबीर मध्ये हिवरखेड, अडगाव, खंडाळा, सौदळा, हिंगणी, तळेगाव तसेच इतर गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या शिबीर मध्ये ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी हिवरखेड ठाणेदार गजानन राठोड, पीएसआय श्रीराम जाधव, प्रफुल्ल पवार, बिट अमलदार महादेव नेवारे, आकाश गजभार संपूर्ण पोलीस बांधवांसह होमगार्ड, शिक्षक वृंद पत्रकार बांधव गावातील गणमान्य व जागरूक नागरिक यांनी सहभाग नोंदविला. रक्तदान हि काळाची गरज असून रक्तदान हे जीवनदान समजल्या जाते. हिवरखेड रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्वांचे पोलीस विभागाच्या वतीने आभार व्यक्त करून धन्यवाद दिले.