(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील रहेबर शाह अकबर शाह व त्यांची विवाहित मुलगी मिनाज परवीन एजाज शाह हे दि.२० नोव्हेंबर रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावरून पवित्र मक्का-मदिना येथे उमरा यात्रेसाठी रवाना झाले. इस्लाम धर्मातील पाच अरकानपैकी एक महत्त्वाचा अरकान म्हणजे पवित्र स्थळांना भेट देऊन हज किंवा उमरा करणे. आर्थिक सक्षमतेनुसार मुस्लीम बांधवांनी जीवनात किमान एकदा हज अथवा उमरा करणं आवश्यक मानलं जातं. या आध्यात्मिक यात्रेच्या निमित्ताने पातुर्डा ग्रामस्थांनी शाह कुटुंबीयांचे अभिनंदन केले. रवाना होण्यापूर्वी आयोजित छोट्या सत्कार कार्यक्रमात रहेबर शाह व मिनाज परवीन यांचा सत्कार करण्यात आला. सुरक्षित व सुखद यात्रेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. तसेच आमंत्रित नागरिक, नातेवाईक व पाहुण्यांसाठी शाह कुटुंबीयांकडून पंगत भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विमानतळावरून निघताना नातेवाईकांसह गावातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत निरोप दिला. यावेळी असदउल्लाह शाह, सकाऊल्लाह शाह, अमीर शाह बाबू, रफिक शाह, अफसर शाह, अबरार शाह, साजिद शाह, राजू शाह, तौसिफ शाह, सिद्दीक शाह, आहिल शाह आदी शाह कुटुंबीय उपस्थित होते.