(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील व शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आज पत्रकार परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन तामगाव पोलीस स्टेशन येथे करण्यात आले. तामगाव पोलीस स्टेशनचे सत्कार घेतलेले अधिकारी पी.एस.आय बोपटे, पी.एस.आय जीवन सोनवणे, सहाय्यक पोलीस अमलदार संतोष आखरे, संतोष गाडे, मनीष वानखडे, उमेश पवार, विनोद निखाते, विकास गव्हाळे, नंदकिशोर दाते, प्रकाश जाधव, उमेश बोरसे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अतिथी पत्रकार शेख कदीर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार शेख कदीर यांच्या पत्नी व मुलीसह शेख रफिक शेख गफूर इत्यादीचीं उपस्थिती होती. यावेळी तामगाव पोलीस विभागातील निवडक कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. सत्कार समारंभात बोलतांना पत्रकार शेख कदीर यांनी पोलीस विभागाच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमांमुळे समाजातील शांतता व सुव्यवस्था राखली जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमात पत्रकार परिवाराच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष आदर व्यक्त करण्यात आला. पत्रकारांनी पोलीस व माध्यम क्षेत्र यांच्यातील परस्पर सहकार्याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय वरवट बकाल येथील माजी सदस्य बिबनूर बी शेख दस्तगीर यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे पोलीस आणि समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर विश्वास आणि आदराची भावना वृद्धिंगत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.