(जिल्हा प्रतिनिधी: कुशल चौधरी)
अंजनगाव सुर्जी : मराठी पत्रकार दिनानिमित्त अंजनगाव सुर्जी येथील पत्रकार बांधवांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी खताळे व प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी आश्विन राठोड साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शफी नियाजी, माजी नगरसेवक अब्दुल आबिद पहेलवान, शेख रहिम, मोहम्मद इद्रिस, माजी नगरसेवक हारुण अली, अब्दुल कलिम, डॉक्टर अमीन, माजी मुख्याध्यापक सय्यद रफीक, एडवोकेट अब्दुल हमीद, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संघठक पुरुषोत्तम घोगरे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर टिपरे, तालुका अध्यक्ष कुशल चौधरी, शहर अध्यक्ष रहेमान भाई उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सांगितले की लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार असून लेखणीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचा काम आणि जनतेला न्याय देण्याचे काम हा पत्रकार करत असतो असे मनोगत मान्यवरांनी यावेळेस व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सुधाकर टिपरे, पुरुषोत्तम घोगरे, कुशल चौधरी, सावळे, गजानन चादुंरकर, अशोक पिंजरकर, प्रेमदास तायडे, रहमान भाई, मनोज मेळे, अमानत भाई, गिरीश लोकरे, महेश वाकपांजर, संघरत्न सरदार, मंगेश इंगळे, सुशील बहिरे, अजय वाहूरवाघ, राजेंद्र भुडेकर, महेंद्र भगत, पंकज हिरुळकर, सचिन इंगळे, चंद्रशेखर मेहरे, आरिफ भाई, अनिल गौर, राजीक सौदागर, प्रकाश खंडारे यांच्या सत्कार शाल पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज मेळे यांनी केले तर प्रास्ताविक सुधाकर टिपरे व आभार महेश वाकपांजर यांनी मानले.