(मतीन शेख)
बुलढाणा : शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय मुलगा मंगळवार २३ जुलैच्या सकाळ पासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. शेगाव शहर पोलीस याचा तपास करीत होती. दरम्यान चिखली तालुक्यातील अंबाशी येथील १० वर्षीय चिमुकल्याचे सुद्धा अपहरण होऊन त्याचा मृतदेह जमिनीत पुरवून ठेवले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आज दि.२५ जुलै रोजी पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय कृष्णा राजेश्वर कराळे या मुलाचे सुद्धा अपहरण करून मृतदेह चिस्तन भास्तन येथील जंगलातील मगर नाल्यात आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहचली असून पंचनामा सुरु केला आहे. तसेच या हत्या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोन संशयीत व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात दोन लहान मुलाचे अपहरण करून दोन दिवसात दोन हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे हे विशेष.
बातमी नीट लीहा
नीटच आहे