(मतीन शेख)
बुलढाणा: अवैध धंद्यांविरोधात सोनाळा पोलिसांचा हल्लाबोल सुरूच आहे. नुकतेच देशी कट्ट्यांच्या कारवाईनंतर आता पोलिसांनी देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमावर कारवाई करत त्यास अटक केली असून, त्याच्याकडून देशी दारू व मोटरसायकल असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, गु.र.क्र. २७९/२०२५, कलम ६५(अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी म्हणून पोलीस शिपाई राहुल रमेश पवार यांनी तक्रार दाखल केली आहे.सदर आरोपी विजय पुंडलिक गोमासे वय ५२ वर्षे, रा. निमखेड, पोस्ट लाढणापुर, ता. संग्रामपूर हा लाढणापुर फाटा, ता. संग्रामपूर येथे देशी दारूची अवैध वाहतूक करत असताना पोलिसांच्या ताब्यात आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून ‘बिग बॉस ५०००’ या देशी दारूच्या प्रत्येकी ९० मि.ली.च्या ४०० शिश्या प्रत्येकी किंमत ४० असा १६ हजार किंमतीचा माल तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली विना नंबरची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल किंमत ४० हजार ताब्यात घेतली.
अशा प्रकारे एकूण ५६ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विशाल गवई, विनोद शिंब्रे, राहुल पवार, संदीप पवार आणि गणेश मोरखडे यांच्या पथकाने केली. दरम्यान, २७ ऑक्टोबर रोजी सोनाळा पोलिसांनी ५ देशी पिस्तूल जप्त करून मोठी कारवाई केली होती, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ही दुसरी धडक कारवाई करून पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात स्पष्ट संदेश दिला आहे. पुढील तपास पोहेकॉ विशाल गवई हे करीत आहेत.